Pages

Wednesday, March 20, 2013

7 Most Beautiful Promises...

7 Most beautiful Promises जे प्रेत्यक प्रेयसीला प्रियकराडुन पाहीजे असतात ♥ ♥

1.जरी आपल लग्न झाल तरी मी माझ्या सोनुलीला नेहमीच
good morning wish करेन.

2. आपण दोघ मिळुन प्रेत्यक संकटाचा सामना करु.

3. मला नेहमी तु माझ्या मिठीत हवी आहेसं. दिवसातुन, at least दहावेळा तरीHug करेन की तुच बोलशील कि बस कर रे!.

4. मी तुला नेहमीच समजुन घेइन पण जर कुठे कमी पडलो तर मला सावरुन घे.

5.जर आपण भांडलो तर मी तुला मिठीत घेइऩ आणि तेव्हा फक्त आणला एकांत बोलेल.

6. असा एक पण दिवस जाणार नाही की तुला kiss केल नाही हा जर मी विसरलो तर तु पण Kiss करु शकतेस.:-D

7. मी नेहमीच तुझ्यावर प्रेम करेन कुठलही कारण नसताना किंवा असताना तुच माझ जगं आहेस......♥

Tuesday, March 19, 2013

Tula Mazi Athavan Kadhich Nahi Aali..?? तुला माझी आठवण कधीच नाही आली..??

प्रियकर स्वदेशात आल्यावर..

प्रेयसी - तुला माझी आठवण कधीच नाही आली..??

प्रियकर - अ हं कधीच नाही आली..

फक्त तिथे कोणी ओरडलं कि बाबांची आठवणयायची... बाकी कोणाचीच नाही..
खानावळीत जेवताना आईची आठवण
यायची... बाकी कोणाचीच नाही..

संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो कि मित्रांची आठवण यायची...
बाकी कोणाचीच नाही..

रात्री झोप नसेल येत तर आजीच्या थोपटण्याची आठवण यायची...
बाकी कोणाचीच नाही..

प्रेयसी - ( रुसून ) माझी..?? माझी आठवणकधीच नाही आली..???..

प्रियकर - आठवत नाही पण बहुतेक
कधीच नाही आली.... (मान खाली घालून

नाक मुरडून ती प्रेयसी बसली..)

तेव्हा तो हळूच म्हणाला, "हं पण एक गोष्ट
होयची तेव्हा तुझी आठवण फार फार यायची.."

प्रेयसी - (खूप उत्साहाने..) केव्हा..??
केव्हा..??

प्रियकर - जेव्हा जेव्हा मी श्वास
घ्यायचो तेव्हा तेव्हा.. ... ♥...

Monday, March 18, 2013

Tu Mala Avadates... तू मला आवडतेस...

तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस , “तू नेहमीच असा वागतोस मुद्दाम मला छळतोस ”,

तेव्हा तू मला आवडतेस..

... तू जेव्हा म्हणतेस, “मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”

आणि लगेच विचारतेस ,“बोलतोस का आता ?”,

तेव्हा तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस, “ परत जर असा वागलास तर..

मी तुला कायमची सोडून जाईन... लक्षात ठेव ” ,

तेव्हा तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस ,”मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय ..

आणि मला माहितीये की तुही माझ्याशिवाय..”

आणि पटकन मला मिठी मारतेस,

तेव्हा तू मला आवडतेस..
तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस , “तू नेहमीच असा वागतोस मुद्दाम मला छळतोस ”,

तेव्हा तू मला आवडतेस..

... तू जेव्हा म्हणतेस, “मला तुझ्याशी बोलायचे नाही आता ..”

आणि लगेच विचारतेस ,“बोलतोस का आता ?”,

तेव्हा तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस, “ परत जर असा वागलास तर..

मी तुला कायमची सोडून जाईन... लक्षात ठेव ” ,

तेव्हा तू मला आवडतेस..

तू जेव्हा म्हणतेस ,”मी जगू शकत नाही तुझ्याशिवाय ..

आणि मला माहितीये की तुही माझ्याशिवाय..”

आणि पटकन मला मिठी मारतेस,

तेव्हा तू मला आवडतेस..

Shri...

Thursday, March 14, 2013

Tuzi Sobat... तुझी सोबत...

ति: मला आज खूप भिती वाटतेय रे..

तो: का..? कशाची..?

ति: मला सारखा वाटतंय कि तुझी सोबत
आता नसणार मला...

तू असं कर एकवेळ
मला मिठीत घे...
( ति त्याचा हात हातात घेते..)

तो: अशी का वेड्यासारखी करतेस सगळे
बघत आहेत..

ति: खरंच रे एक ना माझं,
मला समजून घेरे प्लीज...

तो: चल वेडेपणा करू नकोस.
(तो हात सोडवून घेतो अन् तिला थोडं दूर ढकलतो..)

खरंच तेवढ्यात मागून एक ट्रक येवून
तिला चिरडतो....

आणी त्या दोघांची सोबत
तिथेच संपते...!!!!!..
:'( ♥ ♥ ♥
Plz Read:

ति: मला आज खूप भिती वाटतेय रे..

तो: का..? कशाची..?

ति: मला सारखा वाटतंय कि तुझी सोबत
आता नसणार मला...

तू असं कर एकवेळ
मला मिठीत घे...
( ति त्याचा हात हातात घेते..)

तो: अशी का वेड्यासारखी करतेस सगळे
बघत आहेत..

ति: खरंच रे एक ना माझं,
मला समजून घेरे प्लीज...

तो: चल वेडेपणा करू नकोस.
(तो हात सोडवून घेतो अन् तिला थोडं दूर ढकलतो..)

खरंच तेवढ्यात मागून एक ट्रक येवून
तिला चिरडतो....

आणी त्या दोघांची सोबत
तिथेच संपते...!!!!!..
:'( ♥ ♥ ♥

Tuesday, March 12, 2013

Prem...प्रेम...

जेव्हा तुम्ही कोणा खास
व्यक्ती बरोबर
असता.तुम्ही त्याचाकडे
दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,पण
जेव्हा ती खास
व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.तेव्हा तुमची नजर
त्यालाच शोधत असते.हो ना .... ♥

Ek Vilakshan Premkatha...एक विलक्षण प्रेमकथा...

एक विलक्षण प्रेमकथा..
.
अदिती आणि निरव हे गेली दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.दिवसभर work मध्ये असणारा निरव दररोज संध्याकाळी 9 वाजता तिला फोन करायचा. बोलताना त्याचं सुरवातीचं एक वाक्य कायमचं ठरलेलं असायचं.ते म्हणजे hey dear i lov u.हे वाक्य ऐकल्याशिवाय अदितीला कधी झोपच यायची नाही.एक दिवसही तिचा असा गेलेला नसतो की तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही.एक दिवस सत्याचा सामना करायचं ठरवुन नीरव तिला घरी घेऊन गेला आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं सांगितलं.त्याच्या आई वडीलांनी मोठ्या मनाने त्यांच्या नात्याला परवानगी दिली.त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.आणि त्यांना सल्ला दिला की एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन या.त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकुन ते कुलदेवतेच्या दर्शनाला गेले.दोघांनी देवाला नमस्कार करुन आपली इच्छा देवाजवळ व्यक्त केली.अदितीने मनोमनी देवाजवळ मागणं मागितलं की,देवा निरवच्या कोणत्याही bst 3 wishesh तु पुर्ण कर,एवढंच माझं मागणं आहे तुझ्याकडे..निरव ने मागणं मागितलं कि,देवा ही जे काही तुझ्याकडे मागतेय ते ते तु तिला दे.देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त करुन ते तिथुन निघतात.
यानंतर अदितीचं त्यांच्या घरी येणंजाणं म्हणजे कायमचंच होऊन जातं.पण तरीही त्यांच मोबाईलवरचं बोलणं काही थांबलं नव्हतं.
एक दिवस अदिती निरवला पुर्वकल्पना देऊन दोन दिवसांच्या summer campला जाते,एकडे निरवला त्याच्या working site वर जोराचा अपघात होतो.त्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागतो.त्याच्या आईवडीलांना याचा जोराचा धक्का बसतो पण ते हृदयावर दगड ठेवुन ठरवतात की यातलं काहीही अदितीला कळु द्यायचं नाही,कारण ती हे अजिबात सहन करु शकणार नाही.दोन दिवसांच्या समर कँप नंतर जेव्हा ती त्याच्या घरी येते,तेव्हा त्याचे आईवडील त्याच्याविषयी सांगणं टाळुलागतात.पण हार चढवलेला निरवचा फोटो बघुन,ती हिसक्याने तो हार खेचते.आणित्यांना म्हणते,अंकल ही कसली चेष्टा आहे,त्याच्या फोटोवर हार का चढवला होता तुम्ही ?शेवटी लपवता येणं कठीण वाटु लागल्यावर ते तिला सर्व हकीकत सांगुन टाकतात.पण तिला ही गोष्ट न पटणारी असते.ती म्हणते,हे कसं शक्य आहे?गेले दोन दिवस आम्ही contact मध्ये आहोत,त्याने मला कालच तर call केला होता.ती तिच्या cellphoneमधील recived calls मधील निरवचा नंबर दाखवते.पण त्यावर आता calling करुन पाहताना तो नंबर बिझी दाखवत असतो.पण तरीही ती त्यांना पटवुन देण्यासाठी सांगते कि निरव every evening 9.pmला मला कॉल करतो.आजही तोकॉल नक्कीच करेल.
उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर विश्वास ठेवतात.
ते सायंकाळचे आठ वाजल्या पासुनच तिचा cellphone टेबलवर ठेवुन,तीन बाजुला तिघे जण बसलेले असतात.तिघांच्या ही नजरा cellphone वर खिळलेल्या असतात.तिघांच्या ही मनात एक चलबिचल आणि भीती असते.घड्याळात 9 चा ठोका पडतो.आणि त्या मोबाईलची रिंग वाजते.थरथरत्या ह!ताने अदिती तो फोन लाऊडस्पीकरवर ON करते,आणि त्यातुन आवाज येतो,hey i love u dear! हे ऐकुन त्याच्या आई वडीलांना हा विश्वास पटतो की हा निरव आहे तो म्हणतो,मला माहीतीयेमम्मी पप्पा तुम्हीही मला ऐकताय,अ!दिती,मम्मी पप्पा जेकाही म्हणतायेत की मी मेलोयते अगदी खरंय..
अदितीःमग तु सध्या आमच्याशी बोलत कसा आहेस?कसली मस्करी करतोयस?
निरवःही सुद्धा तुझीच कृपा आहे.तुने देवाकडे मागितलेले माझे 3 wishash पुर्ण करण्याचे मागणे,यातली ही माझी दुसरी wish होती कि मी मृत्युनंतरही काही दिवस तुझ्याशी बोलु शकेन.आणि तिच इच्छा सध्या देव माझी पुर्णकरतोय.
ते जाऊदे पण एक लक्षात ठेव तुला आता तुझं आयुष्य सावरायचंय आणि योग्य तो वर बघुन तुला लग्न करायचंय माझ्या आठवणीत तु तुझं आयुष्य बरबाद करु नयेस असं मला वाटतं.
अश्रुंनी भिजलेल्या चेहर्याने ती म्हणते,ठीकेय मी करीन लग्न! पण तुझी पहीली wish काय होती.
निरवःअगं ती तर मी मंदिरातच मागितली होती,तु जे मागतीयेस ते तुला मिळो,आणि देवाने तुला दिलं....सॉरी पण मला जावं लागेल उद्यापासुन मी तुला कॉल करु शकणार नाही.
आई वडीलांना तो हिचं लग्न करुन देण्यास सांगतो आणि लगेच फोन कट होतो....
अदितीच्या मनातला एक प्रश्न तर अनुत्तरीतच राहतो की निरवची तिसरी wishकाय होती.
.
.
.
.
.
आज अदितीचं लग्न होऊन सहा वर्षे झाली.ती एका श्रीमंत घरात नांदतीये.संध्या काळचेनऊ वाजतायेत. तिच्या मोबाईलची पुन्हा एकदा रिंग वाजते,ती फोन उचलते हेलो कोन? समोरुन आवाज येतो,hey i love u dear!निरव हा तुच आहेस,कुठे आहेस तु?कुठे होतास तु?
तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाही.तिच्या cellphone वर पडलेला नंबर ती बघते.तिच्याच बंगल्यातील hall मधला landlineचा नंबर असतो तो...
.
bedroomमधुन बाहेर येऊन ती hallमधल्या त्या phoneकडे ती बघते...फोनवर तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा असतो जो तिच्याकडे बघुन हसत असतो.आत्ता तिला कळतं की निरवने देवाकडे त्याची तिसरी wish कोणती मागितली होती ते।
सहा वर्षे निरवच्या आठवणीँनी दबल्या गेलेल्या तिच्या अश्रुंना आज तिने तीच्या मुलाच्या रुपातील निरवला मिठीत घेऊन मोकळीक दिली,ज्यामुळे तिचं मन खुपच हलकं झालं..
मित्रांनो काहीजणांच प्रेम हे अद्वितीय असतं.जे वास्तविकतेच्या खुपच
पलीकडचं असतं.पण खुप वेळा अशा प्रेमाला त्याचं योग्य स्थान मिळत नाही,आणि म्हणुन त्याची योग्य किंमत कळत नाही.अन जेव्हा त्याची योग्य किंमत आपल्याला कळते.तेव्हा त्याची किंमत ठेवण्याइतकी, आपल्याला किँमत राहीलेली नसते..

Wednesday, March 6, 2013

Kadhi Kadhi...कधी कधी...

कधी कधी वाटतं
माझं ही कुणी असावं
मीठी मध्ये तिच्या
तासन तास बसावं,

पावसात एकत्र फिरावं
नदीकाठी बसावं
तिच्या सहवासात
स्वतःला विसरावं,

सुख दुखात तिच्या
असं सामील व्हावं
की रुततील काटे तिच्या पायाला
आणि लागतील माझ्या काळजाला घावं,

तिच्यावर इतक प्रेम करावं
की जगातलं सगळ सुख तिला द्यावं
तिच्या डोळ्यात आपलं
प्रेमाचं जग पाहावं,

मिळेल का अशी प्रियसी
नेहमी शोधात फिरावं ...
मिळेल अशी कोणी तरी
या आशेवर जगत राहावं....

Photo: कधी कधी वाटतंमाझं ही कुणी असावंमीठी मध्ये तिच्यातासन तास बसावं,पावसात एकत्र फिरावंनदीकाठी बसावंतिच्या सहवासातस्वतःला विसरावं,सुख दुखात तिच्याअसं सामील व्हावंकी रुततील काटे तिच्या पायालाआणि लागतील माझ्या काळजाला घावं,तिच्यावर इतक प्रेम करावंकी जगातलं सगळ सुख तिला द्यावंतिच्या डोळ्यात आपलंप्रेमाचं जग पाहावं,मिळेल का अशी प्रियसीनेहमी शोधात फिरावं ...मिळेल अशी कोणी तरीया आशेवर जगत राहावं.....

Monday, March 4, 2013

Kunitari...कुणीतरी...


कुणीतरी लागत, आपल्याला वेडं म्हणणारं,

वेड म्हणताना, आपल्यातल शहाणपण जाणणारं,

कुणीतरी लागतं आपल्याला साथ देणारं,

पडत असताना अलगद तोल सावरणारं,

कुणीतरी लागतं आपलेपण जाणणार,

सुखं दु:खाच्या क्षणांना ह्रदयात साठवणारं,

कुणीतरी लागतं नातं जपणारं,

नात्यातील अश्रुंची किंमत जाणणारं,

कुणीतरी लागतं आपल्याला आपलं म्हणणारं,

दूर राहूणही आपलेपणं जपणारं..


Sunday, March 3, 2013

Marathi Mulagi...मराठी मुलगी...

मराठी मुलगी कशी ओळखाल?????
कॉलेजमधे अनेक सुंदर
मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
कॉलेजमधे मुली जीन्स घालुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
कॉलेजमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखालीवाजवते
ती मुलगी मराठी असते
कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते
प्रेम सगळे करतात
पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते.......


http://marathipremachyakavita.blogspot.in/

Friday, March 1, 2013

विरह कविता...Virah Kavita...

जेंव्हा आठवेल
तुला तो दिवस ..
गुलाबाचे फुल देऊन
मी केलेला प्रोपोस ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील
ना ? ..
जेंव्हा आठवतील
तुला ती सोबत
घालवलेली संध्याकाळ ..
समुद्राच्या किनार्यावर
मिठीत
घालवलेला तो काळ ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
जेंव्हा आठवेल तुला सोबत
घालवलेला प्रत्येक क्षण..
प्रेमात तुझ्या होणारे वेडे
माझे मन ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील
ना ?
जेंव्हा कोणीच नसेल
तुझी साथ देणारा..
मनापासून तुझ्यावर प्रेम
करणारा ..
तेंव्हातरी आठवण काढशील
ना ..
तेंव्हातरी प्रिये रडशील
ना ?



marathipremachyakavita.blogspot.com

Thursday, February 28, 2013

Kay Pahiles Tu Mazyat...काय पाहिलेस तु माझ्यात...

काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्या तुतलेल्या मनाला सावरले........

काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्यात
जगण्याची उम्मीद
आणलीस.......

काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्या भुतकाळ माहित
असुन मला आपलेसे केले.......

काय पाहिलेस तु माझ्यात
की माझी एवढी काळजी घेतोस......

काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्या साठी उपाशी राहतोस........

काय पाहिलेस तु माझ्यात
कीमाझी प्रत्येक
क्षणाला तुला आठवण
येते........

काय पाहिलेस तु माझ्यात
की माझ्यावर हक्काने
रागावतोस....... ..

काय पाहिलेस तु माझ्यात
की मला राग आल्यावर
माझी समजुत काढतो........

काय पाहिलेस तु माझ्यात
की तुला प्रत्येक वेळेस
माझा सहवास पाहिजे.,,....

काय पाहिलेस तु माझ्यात
की मला जेव्हाभिती वाटते
तेव्हा मला जवळ घेतो........

काय पाहिलेस तु माझ्यात
की तु माझ्यावर इतके प्रेम
करतोस.........

काय पाहीलेस तु माझ्यात
की माझ्याशिवाय तु जगु
शकत नाही........

काय पाहिलेस तु माझ्यात
की मला इतकी आस लावुन
दिली भेटीची.....,.

काय पाहिलेस तु माझ्यात
कि तुझ्या शिवाय
आता मी ही जगु शकत
नाहि........!



http://marathipremachyakavita.blogspot.in/

Wednesday, February 27, 2013

हृदय स्पर्शी...

ते दोघे मार्केट मध्ये गेलेहोते,
त्याच्या साठी शर्ट घ्यायचा होता.
ती त्याच्यासोबत होती. त्याने तिचा हात
पकडला होता.
अचानक तिचा हात निसटला...
त्याच्या हातातून... खूप गर्दी होती..
त्याच्या थोड्यावेळाने लक्षात
आला कि तिचा हात सुटला आपल्या हातातून.
तो कावरा-बावरा होऊन इकडे तिकडे तिला शोधू
लागला. त्याला काही सुचेचना.
घाम फुटायला लागला होता.
इतक्यात त्याला ती एका ज्वेलरी च्या दुकानात
दिसली.
एक लोकेट बघत होती. तो त्या दुकानात आला.
त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, ती वळून
म्हणाली,"छान आहे ना??"
आणि तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं,
त्याचे डोळे पाणावले होते.
तिने विचारलं,"काय झालं?"
त्याने तिला आवेगाने हग केलं,
आणि लगेच सावरून म्हणाला,"तुला आवडली आहे
का ती चेन?"
ती म्हणाली,"हो, खूप."
तो म्हणाला,"मग हि तुला माझ्याकडून गिफ्ट.
""कसलं गिफ्ट? अरे माझा वाढदिवस खूप दूर आहे
अजून."
तो म्हणाला,"हे माझा पहीला valentine
गिफ्ट तुला."
ती म्हणाली,"are you proposing me"
तो म्हणाला,"हो, कारण आज जेव्हा तुझा हात
माझ्याहातून सुटला तेव्हा मला जाणवला
कि तुझ्याशिवाय किती incomplete आहेमी..
प्लीज पुन्हा मला अशी सोडूनजाऊ नकोस, मी...
मी..
"ती लगेच म्हणाली,"नाही जाणार.कधीच
नाही...... नेहमी तुझ्या सोबत राहील,
शेवटच्या क्षणापर्यंत..


http://marathipremachyakavita.blogspot.in/

Monday, February 25, 2013

Lagn Mhanaje kay?? लग्न म्हणजे काय??

लग्न लग्न म्हणजे काय असतं??
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
... लग्न लग्न म्हणजे काय असतं??
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!


लग्न लग्न म्हणजे काय असतं??
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
... लग्न लग्न म्हणजे काय असतं??
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं??
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!  
Ni3

Sunday, February 24, 2013

माझ्या बापाला रडतांना पाहिलय..

मी आज..माझ्या बापाला रडताना पाहिलय.
शांत चेहरा, ना शब्द काही,
डोळ्यात प्रेम साठलेले,
तो मजसंगे नेहमी डोळ्यांनीच बोलत राहिला.
मी नेहमी त्याला कठोर समजायचो,
दुखी झालो की आईच्या कुशीत लपायचो,
तो मात्र मज़ साठी स्वतःचे रक्त विकत राहिला.

स्वतःच्याच हातून ,मी त्याच्या,
स्वप्नांना तुटतांना पाहिलय,
होय, मी आज...
माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

आई,मला सायकल हवी,
आई म्हणायची बेटा पैसे नाही,
दुसर्या दिवशी माझ्या हातात चावी असायची.
मी आई ला बीलगायचो,आई ही मला कुर्वळायची,
पण तिच्या डोळ्यात खिनता असायची,कारण
त्या सायकलमागे,त्याने त्याची भाकरी सुधा त्यागलेली असायची.

मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

मोठा झालो खर्च वाढला,
मी ही बाकींच्या सारखा मज्जा करायचो,
सिनिमा पहायचो,मुलीसोबत फीरायचो,
छान स्टाइल मधे सिगरेट फुकायचो,
पैसे कमी पडलेच तर आईला मागायचो.
तो थरथरणार्‍या हातानी राब राब राबायचा,
मळलेला कुर्ता फाटलेले धोतर,
पण कधीच मला काही कमी ना पडू द्यायचा.

त्याच्या निघणार्‍या प्रत्येक घामाच्या थेंबात,
माझाच विचार आणि माझेच सुख पाहिलय,
होय, मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

तो जळत राहिला वात बनून,
माज्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी,
मी मात्र त्याचे अंग नि अंग नोचले,
स्वतःचे शॉक पाणी पूर्ण करण्यासाठी,
चुक कळली मला,
त्याच्या स्वप्णाना पूर्ण करावसं वाटतय,
त्याच्या पायावर डोके ठेवून रडावसं वाटतय.
पण, आज तो या जगात नाही.
मला हसतांना पाहून ,उपाशी पोटाने ,
मी त्याला शांत हसतांना पाहिलय,
होय ,मी आज... माझ्या बापाला रडतांना पाहिलय.

तरीही....
माझ्या प्रत्येक संकटात,
मी त्याला माझा विश्वास बनून उभा राहतांना पाहिलय
होय, मी आज...
माझ्या बापाला रडतांना पाहिलय......


http://marathipremachyakavita.blogspot.in/

Saturday, February 23, 2013

Ashrunchi kahani...अश्रुंची कहाणी...

एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,


कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,


रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,


सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,


आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,


भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुळेच आज हे जग आहे.


अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुंची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी...



एकदा डोल्यांतल्या एका अश्रुने दुस-याला विचारले......
'ए आपण असे कसे रे
ना रंग, ना रूप,
नेहमीच चिडीचुप,
आनंद झाला तरी डोळ्यातुन बाहेर,
दु:खाच्या प्रसंगीही दुराव्याचा आहेर,


कोणीच कसे नाही थांबवत आपल्याला,
किनारा ही नाही साधा या पापण्याला............
दुस-यालाही मग जरा प्रश्न पडला,
खुप विचार करून तो बोलला,


रंग-रूप नसला तरी,
चिडीचुप असलो जरी,
आधार आपण भावनांचा,
आदर राखतो वचनांचा,


सान्त्वनांचे बोल आपण,
अंतरीही खोल आपण,
सुखात आपले येणे व्यक्तिपरत्वे,
दु:खाच्या प्रसंगी आपलेच महत्व,


आपल्याला नाही कोणी थांबवु शकत,
बंधनात नाही कोणी बंधवु शकत,
उद्रेक आपण मनातील वेदनांचा,
नाजुक धागा वचनातील बंधनांचा,


भावबंध ह्र्दयातील रुदनांचा,
स्वरबद्ध झंकार तनातील स्पंदनांचा ,
म्हणुनच,
आपले बाहेर पड़णे भाग आहे,
आपल्यामुळेच आज हे जग आहे.


अशीच आपली कहाणी.........
ऐकून ही अश्रुंची वाणी
अश्रुच्याच डोळ्यांत आले पाणी...

Edited By : Danish Shaikh

_dAnNy_

Tuesday, February 19, 2013

म्हणून नाही विचारलं मी तिला !!!

म्हणून नाही विचारलं मी तिला !!!
ती आवडली , पण मी नाही विचारलं तिला....
Delete करेल friend लिस्ट मधून ती मला,
बोलणार नाही माझ्याशी , म्हणून नाही विचारलं मी तिला....
चुकीच्या नजरेने पाहिल ती मला म्हणून नाही विचारलं मी तिला.......
एक गैरसमज करून घेइल ती माझ्याबद्दल , म्हणून नाही विचारलं मी तिला......
सामोर कसा जाणार तिच्या , म्हणून नाही विचारलं मी तिला.....
भेटून सुधा नाही भेटणार , म्हणून नाही विचारलं मी तिला.....
कोणाला सांगूही शकणार नव्हतो , की कीती आवडते ती मला ,
कसा सांगणार मी तिला , की खुप आवडते ती मला ?
भीती वाटते त्या एका “नाही” ची , म्हणून नाही विचारलं मी तिला......
अजुन किती Valentine Days निघून जातील, पण नाही विचारणार मी तिला.......
राहू दे मला या गोड अशा गैरसमजुतित की,
"आवडतो मी तिला "
"आवडतो मी तिला "



Photo: म्हणून नाही विचारलं मी तिला !!!
ती आवडली , पण मी नाही विचारलं तिला....
Delete करेल friend लिस्ट मधून ती मला,
बोलणार नाही माझ्याशी , म्हणून नाही विचारलं मी तिला....
चुकीच्या नजरेने पाहिल ती मला म्हणून नाही विचारलं मी तिला.......
एक गैरसमज करून घेइल ती माझ्याबद्दल , म्हणून नाही विचारलं मी तिला......
सामोर कसा जाणार तिच्या , म्हणून नाही विचारलं मी तिला.....
भेटून सुधा नाही भेटणार , म्हणून नाही विचारलं मी तिला.....
कोणाला सांगूही शकणार नव्हतो , की कीती आवडते ती मला ,
कसा सांगणार मी तिला , की खुप आवडते ती मला ?
भीती वाटते त्या एका “नाही” ची , म्हणून नाही विचारलं मी तिला......
अजुन किती Valentine Days निघून जातील, पण नाही विचारणार मी तिला.......
राहू दे मला या गोड अशा गैरसमजुतित की,
"आवडतो मी तिला "
"आवडतो मी तिला "
♥•╰☆╮$нαиυ ╰☆╮•♥

Sunday, February 17, 2013

पाऊस कविता...Paus Kavita...

पावसात भिजताना
तूच येतोस जणू जवळ
तूही असाच ओढतोस मिठीत
अगदी जवळ अगदी जवळ

अंगाखांद्यावर हात त्याचे
कधी रेशीम कधी लागट
तूही कधी मित्र असतोस
कधी घुसळण अति चावट

बास आता म्हणूनही
तूमचा जोर संपत नाही
चिंब भिजण्याचे क्षण
किती दिवस आठवत राही

येणार येणार वाट पहात
तूम्ही दोघं येत नाही
आलात तर असे जोरात
तड तड जशी लाही

पाऊस पडून गेल्यावर
कसं छान मोकळं होतं
तू भेटून गेल्यावरही
तसंच काहीसं होतं....



पावसात भिजताना 
@[203937403080393:274:तू]च येतोस जणू जवळ
@[203937403080393:274:तू]ही असाच ओढतोस मिठीत 
अगदी जवळ अगदी जवळ 

अंगाखांद्यावर हात त्याचे 
कधी रेशीम कधी लागट
@[203937403080393:274:तू]ही कधी मित्र असतोस 
कधी घुसळण अति चावट 

बास आता म्हणूनही 
@[203937403080393:274:तू]मचा जोर संपत नाही 
चिंब भिजण्याचे क्षण 
किती दिवस आठवत राही

येणार येणार वाट पहात 
@[203937403080393:274:तू]म्ही दोघं येत नाही 
आलात तर असे जोरात 
तड तड जशी लाही

पाऊस पडून गेल्यावर 
कसं छान मोकळं होतं
@[203937403080393:274:तू] भेटून गेल्यावरही 
तसंच काहीसं होतं....


@[655768676:2048:Ashish Amod Prabhudesai]

Thursday, February 14, 2013

Prem Mhanaje Kay?

पहिल्या सरीचा पहिला थेंब
म्हणजे प्रेम
.
मनात पेटलेला गारवा
म्हणजे प्रेम
.
सावरता आवरता येत नाही
ते म्हणजे प्रेम
.
एखाद्यच्या नावाच कपाळावरच
कुंकू म्हणजे प्रेम
.
कुणाच्या नावावर आयुष्य लिहून
स्वतःचा पत्ता विसरायला लावत
ते म्हणजे प्रेम
.
त्याच नुसत सोबत असण
हे आधार वाटण म्हणजे प्रेम
.
जीवनातली नवी पहाट
म्हणजे प्रेम
.
जगण्यातला खरा अर्थ
म्हणजे प्रेम
.
फक्त एकदा होत
ते म्हणजे प्रेम
.
आणि शेवट्च्य श्वासपर्यंत
जे प्रामाणिक असत
ते म्हणजे प्रेम
खर प्रेम...



Photo: पहिल्या सरीचा पहिला थेंब
म्हणजे प्रेम
.
मनात पेटलेला गारवा
म्हणजे प्रेम
.
सावरता आवरता येत नाही
ते म्हणजे प्रेम
.
एखाद्यच्या नावाच कपाळावरच
कुंकू म्हणजे प्रेम
.
कुणाच्या नावावर आयुष्य लिहून
स्वतःचा पत्ता विसरायला लावत
ते म्हणजे प्रेम
.
त्याच नुसत सोबत असण
हे आधार वाटण म्हणजे प्रेम
.
जीवनातली नवी पहाट
म्हणजे प्रेम
.
जगण्यातला खरा अर्थ
म्हणजे प्रेम
.
फक्त एकदा होत
ते म्हणजे प्रेम
.
आणि शेवट्च्य श्वासपर्यंत
जे प्रामाणिक असत
ते म्हणजे प्रेम
खर प्रेम...
 
 
UA-37571701-1