Pages

Sunday, February 17, 2013

पाऊस कविता...Paus Kavita...

पावसात भिजताना
तूच येतोस जणू जवळ
तूही असाच ओढतोस मिठीत
अगदी जवळ अगदी जवळ

अंगाखांद्यावर हात त्याचे
कधी रेशीम कधी लागट
तूही कधी मित्र असतोस
कधी घुसळण अति चावट

बास आता म्हणूनही
तूमचा जोर संपत नाही
चिंब भिजण्याचे क्षण
किती दिवस आठवत राही

येणार येणार वाट पहात
तूम्ही दोघं येत नाही
आलात तर असे जोरात
तड तड जशी लाही

पाऊस पडून गेल्यावर
कसं छान मोकळं होतं
तू भेटून गेल्यावरही
तसंच काहीसं होतं....



पावसात भिजताना 
@[203937403080393:274:तू]च येतोस जणू जवळ
@[203937403080393:274:तू]ही असाच ओढतोस मिठीत 
अगदी जवळ अगदी जवळ 

अंगाखांद्यावर हात त्याचे 
कधी रेशीम कधी लागट
@[203937403080393:274:तू]ही कधी मित्र असतोस 
कधी घुसळण अति चावट 

बास आता म्हणूनही 
@[203937403080393:274:तू]मचा जोर संपत नाही 
चिंब भिजण्याचे क्षण 
किती दिवस आठवत राही

येणार येणार वाट पहात 
@[203937403080393:274:तू]म्ही दोघं येत नाही 
आलात तर असे जोरात 
तड तड जशी लाही

पाऊस पडून गेल्यावर 
कसं छान मोकळं होतं
@[203937403080393:274:तू] भेटून गेल्यावरही 
तसंच काहीसं होतं....


@[655768676:2048:Ashish Amod Prabhudesai]
 
 
UA-37571701-1