Pages

Thursday, December 12, 2013

Vapu Kale | व पु काळे

कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.

* पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.

* वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

* कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.

* समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

* संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला. 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

* वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

* खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

* सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

* चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

* तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

* औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

* गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

* अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण ज वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

* भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृत आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

* आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो, तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

- व पु काळे


https://www.facebook.com/MarathiPremachyaKavita 
http://www.marathipremachyakavita.blogspot.in/2013/12/vapu-kale.html
 
 
UA-37571701-1