Pages

Tuesday, July 21, 2015

Marathi Kavita

बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..
सांडून जातो धुवांधार
आसुसलेलं, थबकलेलं
बरंच काही.
मोकळं मोकळं करून जातो..
पाऊस सांगत नाही
त्याच्या मनातलं यायच्या आधी,
पण आपल्या मनातलं
सारं काही शहाण्यासारखं समजून घेत
हवं तेव्हा, हवा तसा
आपल्यासाठीच भरून येतो..
निवळशंख पाणी
एक थेंब, दोन थेंब..
आभाळभर रांगच रांग;
पुन्हा थेंब, त्यात पाऊस..
नितळ नितळ करत जातो,
बरंच काही,
आपण मागायच्याही आधी
पाऊस देऊन जातो..
स्पृहा

Friday, March 14, 2014

एकाच वेळी दोघींच्या प्रेमात .. ??

"प्रेम म्हणजे काय?" यावर धागा काढला तर हजारो पोस्ट पडूनही प्रश्न अनुत्तरीतच राहणार यात कोणालाही शंका नसावी.
प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि तरीही बरोबर असू शकते.
पण हे जे काही प्रेम आहे ते "एकाच वेळी" दोघींशी होऊ शकते का हो?
(मी मुलगा आहे म्हणून दोघींशी लिहिले, आपण यापुढच्या लेखात आपल्या सोयीनुसार "दोघींशी" किंवा "दोघांशी" असे काहीही वाचू शकता.)
इथे प्रेम म्हणजे मैत्री, ममता, वात्सल्य असे काही अपेक्षित नाही, तर स्त्री-पुरुष वयात आल्यानंतरचे होणारे प्रेम ज्याला प्रमाण मानून आपण आयुष्याचा जोडीदार निवडतो त्याला डोळ्यासमोर आणा.
काही जण म्हणतात, एकीवरच प्रेम कसे करणार...
कोणाचे डोळे सुंदर असतात, कोणाचे केस, तर कोणाचे गाल...
एखादीचे बोलणे आवडते, एखादीचे दिसणे, तर एखादीचे हसणे...
फिल्मी डायलॉग निव्वळ...
कारण माझ्यामते एखादीचे नुसते आपल्या आयुष्यात असणे जेव्हा आपल्याला आवडायला लागते तेच खरे प्रेम..
इतर गोष्टींना वासना म्हणा, आकर्षण म्हणा, आवड म्हणा...... पण प्रेम .... नाह...!
आजच्या पिढीच्या भाषेत सांगायचे तर ते "इश्कवाला लव" नक्कीच नाही..
असो, तर हे असे प्रेम एकाचवेळी दोघींशी कसे होऊ शकते??
एखादीत मन खरेच गुंतले तर ती आपले सारे आयुष्य व्यापून टाकते तर तिथे दुसरीसाठी जागा कुठून करणार.? त्यासाठी फोर्थ डायमेन्शनमध्येच जावे लागेल ना..
हृदय म्हणजे कप्प्याकप्प्यांचे कपाट आहे का? .. स्वताला हवे तेव्हा एक कप्पा उघडला अन दुसरा बंद केला..
हृदय म्हणजे ड्युअल सिम मोबाईल आहे का? .. कार्ड बदलले की नवीन नेटवर्क पकडले..
हृदय म्हणजे चॅनेल बदलणारा एफ एम रेडिओ आहे का? .. एक खटका दाबला आणि आपोआप ट्यूनिंग होऊन नवीन फ्रीक्वेन्सी सेट झाली..
एखादीवर तुम्ही प्रेम करत आहात आणि त्याचवेळी आणखी एखादी तुम्हाला आवडते याचा अर्थ एकतर त्या दुसरीबद्दलच्या भावना प्रेम नसून वर सांगितल्याप्रमाणे वासना, आकर्षण, आवड या सदरात मोडणार्‍या असाव्यात,
किंवा
तुमचे पहिलीवर आता प्रेम राहिले नाही वा कधी नव्हतेच मुळी..
पण तरीही तुम्हाला असे वाटत असेल तर आता हे तुम्ही स्वताच्या मनाचे समाधान म्हणा किंवा जोडीदाराची समजूत काढणे म्हणा...
वा आपल्या व्यभिचाराचे समर्थन..
पण मी याला व्यभिचारही म्हणू इच्छित नाही जर प्रामाणिकपणे दोघींपैकी कोणावर खरे प्रेम आहे हे स्वताच्या मनाशीच मान्य करून दुसरीजवळ त्याची कबूली दिली तर...
कुछ कुछ होता है या शाहरुखपटात एक संवाद होता - आपण एकदाच जगतो, एकदाच मरतो, वगैरे वगैरे एकदाच करतो, तर तसेच हे प्रेम पण एकदाच करायला हवे.
पण पुढे काय होते तो इतिहास आहे. (चित्रपटप्रेमींना माहीत असेलच.)
हे असे पुन्हा प्रेम होणे यात काही वावगे नाही किंवा हे घडतेच घडते. कारण प्रेम आपण करत नाही तर प्रेम हे होते.
माणूस गेला की संपले सारे. भले त्याने एकेकाळी आपले सारे आयुष्य का व्यापून टाकले असेना.. उलट तेवढीच मोठी पोकळी तो आपल्या आयुष्यात निर्माण करून जातो, जी भरल्याशिवाय आयुष्य पुढे सरकू शकत नाही. अश्यावेळी खरे तर जास्तच गरज असते एखाद्याची.. त्यामुळे प्रेमभंगानंतर पुन्हा प्रेम होणे, आणि या दुसरीशीही प्रेमभंग होऊन परत पहिलीच्याच प्रेमात पडणे असे काहीही होऊ शकते.....
पण एकाच वेळी..? दोघींच्या प्रेमात..? कोण कसे पडू शकते राव..?? हे या अंड्याला कोणीतरी समजवा इथे.
तळटीप - बेफिकीर यांच्या एका ललित-कथेवरून हा विषय निघाला. प्रतिक्रियेत माझे मत एका वाक्यात मांडले तर तिथे पुढच्या सार्‍या प्रतिक्रिया या विरोधातच आल्या. अगदीच राहवले नाही आणि मूळ कथेचा धागा भरकटू नये म्हणून त्यावर सविस्तर मत वेगळा धागा काढून मांडणे योग्य समजले.
अवांतर - मायबोलीकरांचा सरासरी वयोगट अंदाजे माझ्या वयाच्या दीडपट असावा .. त्यातही महिलांचे प्रमाण लक्षणीय .. पण .. पण .. प्रेम हे प्रेम असते, तुमचे आणि आमचे सेम असते .. त्यामुळे दरदिवशी दरडोई किमान एक प्रतिक्रिया तरी अपेक्षित आहे. :)
-आनंद

Tuesday, January 21, 2014

Thursday, January 16, 2014

प्रेमात पडल्यावर!

काय होतं काय नेमकं प्रेमात पडल्यावर? पाऊस पडू लागतो की म्युजिक वाजू लागतं की आकाशवाणी होते ?! खरं तर असं काहीच होत नाही. एखाद्याचे दोष आवडू लागले, त्याच्या टुकार जोक्सवर खळखळून हसू येऊ लागलं आणि काहीही झालं की त्याच माणसाची ओढ लागू लागली ना की समजावं... प्रेमात पडलो आपण. काय बरोबर आहे ना?

Thursday, December 12, 2013

Vapu Kale | व पु काळे

कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.

* पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.

* वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.

* कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं...कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.

* समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचिवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

* संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला. 'अंत' आणि 'एकांत' ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो.

* वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

* खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

* सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

* चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

* तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

* औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.

* गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !

* अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण ज वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".

* भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृत आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

* आपण किती पैसा मिळवला यापेक्षा, तो खर्च करून आपण किती समाधान मिळवले, हे जो पाहतो, तो खरा आनंदी व्यक्ती असतो.

- व पु काळे


https://www.facebook.com/MarathiPremachyaKavita 
http://www.marathipremachyakavita.blogspot.in/2013/12/vapu-kale.html

Friday, December 6, 2013

Nasates Ghari Tu Jevha

Nasates Ghari Tu Jevha

 Nasates ghari tu jevha
jeev tutaka tutaka hoto
jaganyache virati dhage
sansar fataka hoto

Nabh Phatun veej padavi
kallol tasa odhavato
hi dhara dishahin hote
ann chandra poraka hoto

Yetaat unhe darashi
hirmusun jati mage
khidakishi thabakun vara
tav gandhavachun jato

Tav mithit viraghalanarya
maj smarati laghav vela
shwasavin hruday adave
mi tasach agatik hoto

Tu sang sakhe maj kay
mi sangu ya ghardara?
samaeecha jeev udaas
majhyasah min min mitato

Na ajun jhalo motha
na swatantra ajuni jhalo
tujvachun umagat jate
tujvachun janmach adato !

Sunday, October 13, 2013

आज मला खूप एकट वाटतय.

आज मला खूप एकट वाटतय...,
कुणाच्या तरी जवळ बसावस वाटतय...,
कोणाशी तरी खूप खूप बोलावस वाटतय...,
अन मनात चाललेल सगळ काही सांगावस वाटतय....

आज परत एकदा त्याला पहावस वाटतय...,
त्या प्रेमाच्या आठवणीना....., परत जगवावस वाटतय...,
त्याचा हात परत माझ्या हातात घेऊन...,
थोडा चालावस वाटतय....

आज मला खूप खूप रडावस वाटतय....,
स्वतःशी परत खूप भांडावस वाटतय....,
भरलेल्या डोळ्याने...., आरश्या समोर बसावस वाटतय....,
अन आपलं कोणीच नाही..., म्हणून...,
स्वतःचेच डोळे पुसावंस वाटतय...

आज मला परत भूतकाळात जावस वाटतय....
परत एकदा..., त्याच्याच आठवणींत जगावस वाटतय....

फक्त त्याच्याच आठवणींत.......

Monday, August 19, 2013

Pahili Bhet | पहिली भेट


आठवते आपली ती पहिली भेट
एकमेकांकडे बघण्यासही लाजलो होतो
हळूहळू नजर एकमेकांकडे वळताच
आपण जागेपणीच निजलो होतो
आठवते आपली ती पहिली
... भेटतुझं ते पावलोपावली अडखळणं
तेवढचं एक निमित्त पाहून
तुजपाशी माझं आधार देण्यासाठी वळणं
आठवते आपली ती पहिली भेट
पुन्हा भेटण्यासाठी किती आतूर झालेलो
तेव्हा म्हणालीस तुझ्या जिवनात
मी एक खास भेट म्हणून आलेलो
आठवते आपली ती पहिली भेट
मन कसं चंदना सारखं दरवळलं होतं
स्वप्नांचे कोवळे दव झेलत मनात
प्रेम कसं हिरवळलं होतं
आजही ती पहिली भेट
माझं मन गच्च धरुन आहे
जरी नसलो तुझ्या कपाळावर
तरी तुझ्या अंतरी ऊरून आहे..
Pahili Bhet | पहिली भेट

Wednesday, July 24, 2013

Tik Tik Vajate Dokyat | टिक टिक वाजते डोक्यात



टिक टिक वाजते डोक्यात 
धड धड वाढते ठोक्यात 
कभी जमीन कधी नभी 
संपते अंतर झोक्यात
नाही जरी सरी तरी 
भिजते अंग पाण्याने 
सोचू तुम्हे पलभर भी 
बरसे सावन जोमाने 
शिम्पल्याचे शो पीस 
नको 
जीव अडकला मोत्यात 
सूरही तू तालहि तू 
रुठे जो चांद वो नूर हे तू 
आसू हि तू हसू हि तू 
ओढ मनाची नि हुरहूर तू 
रोज नवे भास तुझे 
वाढते अंतर श्वासात
Tik Tik Vajate Dokyat | टिक टिक वाजते डोक्यात

 

Saturday, July 20, 2013

Prem Karanyache Karan | प्रेम करण्याचे कारण!

एका ई मेल मधुन आलेली गोष्ट, जमला तसा अनुवाद केला. आपल्या सगळ्यांसाठी इथे देत आहे. आमच 'पहीलं प्रेम' चर्चेमुळे हा अनुवाद करावा वाटला पहिल्या प्रेमाशी जरी या कथेचा संबंध नसला तरी 'प्रेमाशी' नक्कीच आहे :)

एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,
प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?
प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.

प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाही
सांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे?
प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पण
तु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.

प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द काय
करणार... छे! :(
माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्या
सौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(

प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेम
करतो ...

- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस
- तुझा आवाज खूप गोड आहे.
- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...
- तु खूप सुंदर विचार करतेस
- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..
- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)

प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.

काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानक
अपघात होतो आणि ती कोमात जाते.

प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेले
असते,

प्रिये,

तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.
पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.

तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करत
होतो.
पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावर
प्रेम नाही करू शकत.

जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेम
करावे असे तुझ्यात काहीच नाही.


खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते?....

Thursday, July 18, 2013

Maauli | माउली

हें चि दान देगा देवा ।
तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी ।
हे चि माझी सर्व जोडी ॥२॥
नलगे मुक्‍ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥
तुका म्हणे गर्भवासी ।
सुखें घालावें आम्हांसी ॥४॥
Maauli | माउली

Thursday, July 4, 2013

Tuzya Athavani Mhanaje | तुझ्या आठवणी म्हणजे

तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष
तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव
तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा

आणि

तुझ्या आठवणी म्हणजे... गमवलेल्या गोष्टींची निराशा
तुझ्या आठवणी म्हणजे... पावसात चिंब भिजणं
तुझ्या आठवणी म्हणजे... ओसाड वाळवंटात एकटच भटकणं
तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे
तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!

तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा  आणि  तुझ्या आठवणी म्हणजे... गमवलेल्या गोष्टींची निराशा तुझ्या आठवणी म्हणजे... पावसात चिंब भिजणं तुझ्या आठवणी म्हणजे... ओसाड वाळवंटात एकटच भटकणं तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!

 
 
UA-37571701-1