Pages

Saturday, July 20, 2013

Prem Karanyache Karan | प्रेम करण्याचे कारण!

एका ई मेल मधुन आलेली गोष्ट, जमला तसा अनुवाद केला. आपल्या सगळ्यांसाठी इथे देत आहे. आमच 'पहीलं प्रेम' चर्चेमुळे हा अनुवाद करावा वाटला पहिल्या प्रेमाशी जरी या कथेचा संबंध नसला तरी 'प्रेमाशी' नक्कीच आहे :)

एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,
प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?
प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.

प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाही
सांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे?
प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पण
तु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.

प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द काय
करणार... छे! :(
माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्या
सौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(

प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेम
करतो ...

- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस
- तुझा आवाज खूप गोड आहे.
- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...
- तु खूप सुंदर विचार करतेस
- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..
- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी येग्य वाटते...)

प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.

काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानक
अपघात होतो आणि ती कोमात जाते.

प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेले
असते,

प्रिये,

तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.
पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.

तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करत
होतो.
पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावर
प्रेम नाही करू शकत.

जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेम
करावे असे तुझ्यात काहीच नाही.


खरच का प्रेम करण्यासाठी काही कारण लागते?....
 
 
UA-37571701-1