Pages

Showing posts with label First Love. Show all posts
Showing posts with label First Love. Show all posts

Thursday, April 18, 2013

Maze Maan...माझे मन...

माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले ॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाश ी ॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन ॥
माझे मन...

Ayushya...आयुष्या...


Sunday, April 14, 2013

Premat Padalyananter...प्रेमात पडल्यानंतर...

प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी...

लव्ह अँट फस्ट साईट असो, नाहीतर तिच्या प्रचंड नखर्‍यांनंतर आणि नकारांनंतर मिळालेला होकार असो.किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये अलगदपणे फुललेलं प्रेम असो.. आपण कशाप्रकारे प्रेमात पडतो हे महत्त्वाचं नाही; कारण प्रेमात पडणं तसं सोपं आहे; पण ते प्रेम निभावणं मात्र महाकठीण. एकमेकांना ‘पटवण्याच्या’ हजारो पद्धती तुम्हाला माहीत असतील; पण प्रेमात पडल्यानंतर ते प्रेम निभावणं. फुलवणं त्याचं काय.? ते जमतं तुम्हाला.? की ज्या नात्यावर मनापासून प्रेम केलं तेच नातं जगण्यावर उदास सावली धरतं. तसं कुणाचंचं होऊ नये. म्हणून प्रेमात पडल्यानंतर लक्षात ठेवण्याच्या १२ गोष्टी. प्रेमानं जगण्याच्या, जगवण्याच्या.!

१) कुठलंही नातं विश्‍वासावर अवलंबून असतं. प्रेमात पडल्यानंतर त्या दोघांमध्ये विश्‍वासाचं एक नातं तयार होतं. पण निर्माण झालेला विश्‍वास टिकवणं मात्र गरजेचं असतं. तेव्हा एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवू नका. नात्यात जितकी पारदर्शकता असेल तितकं तुमचं नातं तुम्हाला आनंद देईल.
 

२) एकमेकांना कधीही गृहीत धरू नका. प्रेमात पडल्यानंतर होतं काय की समोरच्या माणसाबद्दल आपण पझेसिव्ह होत जातो. पण सतत एखाद्या माणसाला गृहीत धरलं गेलं तर त्यातून नाराजी निर्माण होऊ शकते.
 

३) प्रेमात पडलो आहोत म्हणजे सतत गोड-गोडचं बोलू, असं काही होत नाही. समोरच्यानं आपल्यापेक्षा निराळं मत मांडलं तरी ते ऐकण्याची, समजून घेण्याची आणि आपल्या मतापेक्षा ते अधिक योग्य असल्याचं लक्षात आलं तर अमलात आणण्याची तयारी असली पाहिजे. अनेकदा होतं काय की मत ऐकून घेतलं जातं; पण निराळं असेल तर त्यावर भांडणं होतात.
 

४) सतत ‘आय लव्ह यू’ म्हटलं नाही तरी आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी आहे हे आपल्या कृतीतून व्यक्त झालंच पाहिजे. एखादं छोटंसं गिफ्ट किंवा एसेमेस किंवा भेट झाल्यानंतर मोकळं हास्य यातूनही ही गोष्ट व्यक्त होऊ शकते. प्रेम आहे पण दाखवायचं नाही, अशी काही जणांना सवय असते.
 

५) अनेकदा पझेसिव्हनेस इतका वाढतो की आपल्या प्रिय व्यक्तीच्या इमेल आणि सोशल नेटवर्किंग साईटचे पासवर्ड मागितले जातात. तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर पासवर्ड मागू नका. आपण प्रेमात पडलो म्हणजे आपली आयुष्य एक झाली असं होत नाही.
 

६) अनेक प्रेमप्रकरणे मोडतात ती इगोमुळे. त्यामुळे रागवा, भांडा अगदी अबोले धरा पण शेवटी सारं विसरून एक व्हा. तरंच नातं निभावणं सोपं जाईल.
 

७) प्रेम आहे म्हटल्यावर एकमेकांची ओढ वाटणार. पण प्रेम आहे म्हणजे शरीरसंबंध झालाच पाहिजे असं काही नाही. त्यामुळे जवळीक असली तरी त्यापुढे जाऊन शरीरानं एकत्र येण्याचं शक्यतो टाळा.
 

८) प्रेमात पडला आहात म्हणजे आता मिठी मारलीच पाहिजे, चुंबन घेतलंच पाहिजे असं काही नाही. तुमच्या जोडीदाराची याबद्दलची मतं समजून न घेता स्वतच्या भावना त्याच्यावर लादण्याची चूक करू नका.
 

९) तुम्ही एकत्र फिरलात की चार लोकांना त्याबद्दल समजणार. चर्चा होणार. गॉसिपही होणार. पण आपल्या प्रेमावर विश्‍वास ठेवून आहे त्या निर्णयावर ठाम राहा. मात्र, आपलं प्रेम बदनाम होईल असं चारचौघात वावरणं म्हणजे स्वातंत्र्य आहे.
 

१0) भटका, सिनेमे टाका, पावसात चिंब भिजा, लाँग ड्राईव्ह वर जा..मज्जा करा. पण जरा डोकं ठिकाणावर ठेवून, नाहीतर आपली शोभा व्हायची समाजात.
 

११) एकमेकांची आर्थिक स्थिती समजून घेणं जरुरीचं आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघंही एकाच आर्थिक गटातले असाल असं नाही. एकमेकांना आर्थिक गटावरून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे डिवचू नका. महागडी गिफ्टस्, शॉपिंग, डिस्को आणि तत्सम गोष्टींसाठी जोडीदाराने पैसा पुरवावा अशी अपेक्षा का करायची.? विशेषत मुली. गिफ्ट म्हणजे प्रेम नव्हे.
 

१२) जे करायचं ते मदमुराद. मोकळेपणानं. दिलखुलासपणे करा, पण कमिटमेण्ट पाळा. प्रेम म्हणजे जबाबदारी, तो स्वीकारता यायला हवी.


Photo: माझ्यासारखं तुझंही ह्रदय,

कुणासाठी तरी तुटेल एकदा..

तुझ्याही अंतकरणात भावनानचे आभाळ,

... कुणासाठी तरी दाटेल एकदा..

Prem Kavita...प्रेम कविता...

मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..
पण तिनेही करावं प्रेम म्हणुन दबाव आणु नका,

मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..
पण स्वप्न पूर्ण करताना मागे कधी फिरू नका,

मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..
पण प्रेम केलं तर तिला सोडून कधी जाऊ नका,

मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..
पण तिच्या सुःखापुढे इतर कसलाही विचार करू नका,

मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..
पण स्वःताच्या स्वार्थासाठी तिच्या जिवाचा खेळ कधी करू नका,

मी असं नाही सांगत की प्रेम करू नका..
प्रेम करतोय असं दाखवून तिचा बळी तरी घेऊ नका

Friday, April 12, 2013

Eka Talavachya Kathavar..एका तलावाच्या काठावर..

♥ एका तलावाच्या काठावर ... ♥

प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!

प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ ...त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू, किती छान बदके आहेत बघ,

प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत
नाही ...वास्तविक मी तुझ्यावर, " त्या पांढर्‍या शुभ्र सुंदर बदकांसारखे
नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"

प्रेयसी :- ते कसे ?

प्रियकर:- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे
उडून जातात,... तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच
मरते...


♥ एका तलावाच्या काठावर ... ♥

प्रियकर :- चल तिथे बसू, किती छान कमळ आहे बघ ...!

प्रेयसी :- ई !! ... नको, खाली किती चिखल आहे बघ ...त्यापेक्षा तलावाच्या त्या बाजूला बसू, किती छान बदके आहेत बघ,

प्रियकर :- वरवरच्या सौंदर्या कडे आपण बघतो म्हणूनच आत मधले प्रेम लवकर कळून येत
नाही ...वास्तविक मी तुझ्यावर, " त्या पांढर्‍या शुभ्र सुंदर बदकांसारखे
नव्हे तर चिखलात उमललेल्या कमळासारखे प्रेम करतो"

प्रेयसी :- ते कसे ?

प्रियकर:- "जे पक्षी तलावाच्या पाण्यात राहतात ते तलाव सुकून गेल्यावर दुसरीकडे
उडून जातात,... तेच जे कमळ त्या तलावात वाढते ते मात्र त्या तलावा बरोबरच
मरते...

Wednesday, April 10, 2013

गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा...! Gudipadavyachya Hardik Shubhechya...


आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेछा...!
मराठी संस्कृती , मराठी मान ...मराठी परंपरेची , मराठी शान ....!
हे नवीन"मराठी वर्ष"
सुखाचे,
समृद्धीचे,
... आनंदाचे,
भरभराटीचे
यश - किर्तीचे,
दुःख विरहित जाओ .
चांगल्याचा वाईटावर विजय सत्याचा, असत्यावर विजय करुनी आले रामराया घरा.. मोह न आवरे आता कोणाला चला गुढी उभारून , करू सण हा साजरा... चैत्र महिन्यतला दिन हा हर्षाचा...सोहळा हा आगळा...
नव वर्षाचे स्नेह भाव वाढवूनी, करू
संकल्पना , ऋणानुबंधनाचे नाते अधिक घट्ट करुया..!
आयुष्यात जगताना गाठीला आलेले कडू अनुभव लिंबाच्या पानासारखे स्वीकारत भलेपणाचा गोडवा ओठावर ठेवावा असा पाडवा
समंजस नववर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....!

Premachi Kimmat...प्रेमची किम्मत...


Friday, April 5, 2013

Marathi Prem Kavita..मराठी प्रेम कविता....

तू माझ्याशी लग्न करशील... ?

एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भाळुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्य आहे, तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि
लग्न करण्या पेक्षा,
तू माझ्याशी लग्न करशील.... ?

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील... ?

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..

तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखय म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नास मान्यता देतील.
पण जीवनाशी तडजोड करणार्या श्रीमनताशी,
काय तू जीवनभराच नात जोडशिल..
अग एका हृदयाने भिकारी मुलाशि लग्न करण्या पैक्शा, तू माझ्याशी लग्न करशील..

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण...एका -अनोळखी मूलाशी लग्न करण्या पेक्षा, तू माझ्याशी लग्न करशील.?

मित्र आणि मैत्रिनिनो
तुम्हाला काय वाटत आहे..
ती होकार देईल...?


Aathavan Mazi...आठवण माझी...

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
... नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल


Thursday, April 4, 2013

Sawali...सावली...

माझ्या सावलीलाही सवय
तुझ्या आठवणींची,
आठवणी त्याच
तुझ्या मनातल्या साठवणींची,
क्षितिजाच्या समांतर
तू हि आहेस
अशी आशा बाळगण्याची,
एकटेपण स्वतःच
स्वताशीवाटून
घेण्याची,
आणि सवय झाली आहे
मला आता,
तुझ्या आठवणीत
जगण्याची...
 
 
UA-37571701-1