Pages

Friday, March 22, 2013

Mala Tila Pahayach Aahe...मला तिला पाहायचे आहे...

आता मला तिला पाहायचे आहे
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?......

सतत मी तिचा विचार करत असतो
क्षणाक्षणाला मी तिच्या प्रेमात पडत असतो
बोलायला जावेतर ती हसत विषय बद्लत असते
माझ्या काळजाचे ठोके वाढवत असते

म्हणूनच मला तिला विचारायचय
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?....

प्रेम करणे कधी वेडेपण असते
प्रेमात पडणारे सुद्धा वेडेच असतात का ?
मी तिच्या प्रेमात वेडा झालो आहे
ती सुद्धा माझ्या प्रेमात पडेल का ?...

म्हणूनच मला तिला विचारायचे आहे ....
ती जवळ येताच तिला म्हणायचे आहे
तू माझी होशील का ?....


आवडलं तर नक्की comment and share kara
http://marathipremachyakavita.blogspot.in/ 


Photo: तू मला का आवडतेस ?
मला नाही माहित,
पण खूप आवडतेस,
इतकच मला माहित....

... ना तू राजकुमारी, ना तू खूप सुंदर,
तरीही तू खूप सतवतेस मला,
हृदय किती धडधडत होतं माहितीय??
हळूच तिरक्या नजरेने जेव्हा बघत होतीस मला.

मिठीत तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
देठावर कळीने अलगत उमलावं तसं,
स्पर्शाने तुझ्या काय सांगू...वाटतं कसं?
लाटाचं किनार्याशी मिलन होतं तसं...

मी काहीही केले तरी तुला ते सुंदरच वाटते,
तुझ्यासोबत मी न जाने कितींदा संसार थाटते.
तू नेहमी विचारतेस ना मी इतकी सुंदर नाही तरी तू प्रेम केलं?
सुंदर नाही गं .....पण तुझ्या सुंदर मनाशी प्रेम केलं

आवडतं मला तुझं.....माझ्या स्वप्नात येणं,
माझा हात चालता चालता तुझ्या हातात घेणं
हे सगळं असंच मला आयुष्यभर देशील का?
स्वर्ग नकोय मला...असंच नेहमी तुझ्या मिठीत घेशील का?

अक्षरश: वेडा आहे मी तुझ्यासाठी,
फक्त एक कर माझ्यासाठी..
बाकी काही नाही दिलंस तरी चालेल,
फक्त खूप आठवणी दे मला....मरताना हसण्यासाठी....

-- समीर पेंडुरकर (घाडी)


 
 
 
UA-37571701-1