Pages

Friday, March 1, 2013

विरह कविता...Virah Kavita...

जेंव्हा आठवेल
तुला तो दिवस ..
गुलाबाचे फुल देऊन
मी केलेला प्रोपोस ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील
ना ? ..
जेंव्हा आठवतील
तुला ती सोबत
घालवलेली संध्याकाळ ..
समुद्राच्या किनार्यावर
मिठीत
घालवलेला तो काळ ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
जेंव्हा आठवेल तुला सोबत
घालवलेला प्रत्येक क्षण..
प्रेमात तुझ्या होणारे वेडे
माझे मन ..
तेंव्हा डोळे तुझे भरतील ना..
तेंव्हा तरी प्रिये रडशील
ना ?
जेंव्हा कोणीच नसेल
तुझी साथ देणारा..
मनापासून तुझ्यावर प्रेम
करणारा ..
तेंव्हातरी आठवण काढशील
ना ..
तेंव्हातरी प्रिये रडशील
ना ?



marathipremachyakavita.blogspot.com